प्रा. सुनीता कुलकर्णी
योग हे भारतीय तत्त्वज्ञानातील एक महत्त्वाचा विचारप्रवाह आहे. पतंजलींच्या अष्टांगयोगातून शरीर, मन व आत्मा यांचे संतुलन साधून आत्मोन्नती साधता येते. मनाच्या शुद्धतेसाठी योग आवश्यक आहे. संत साहित्य, भगवद्गीता, उपनिषदांत मनाचे महत्त्व अधोरेखित आहे. योगाद्वारे सजग, सुसंस्कृत, संतुलित व्यक्तिमत्त्व घडते. शिक्षणातही मनोबल वाढवणाऱ्या योगाचा अंतर्भाव गरजेचा आहे.
भारत हा अध्यात्मसंपन्न योगविश्वाचे माहेरघर आहे. या वेदभूमीवर योगाचे बीज अनादिकालापासून रोवले गेले. हा योगवृक्ष महान ऋषी, मुनी आणि योगींनी जोपासला, सात्त्विक साधकांनी बहरवला आणि धर्म, विज्ञान, कला, तत्त्वज्ञान यांच्या प्रयोगात्मक हेतूंनी समृद्ध केला. भारतीय तत्त्वज्ञान विशद करणाऱ्या सहा दर्शनांपैकी योग हे एक महत्त्वाचे दर्शन आहे.