डॉ. नरेंद्र धारणे
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः।
गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ।।
गुरू ब्रह्म आहे, गुरू विष्णू आहे, गुरू शंकर आहे. अशा साक्षात परब्रह्म असलेल्या गुरूला मी वंदन करतो/करते अशा अर्थाच्या या श्लोकात गुरूची महती सांगितलेली आहे.
भारतीय संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान अत्यंत उच्च मानले गेले आहे. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा दिवस शिष्याने आपल्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा. हिंदू, बौद्ध, जैन आणि इतर अनेक धार्मिक परंपरांमध्ये आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून विशेष स्थान आहे.