Premium|Viral Rickshaw Video : भूमकर काका झाले 'सेलिब्रिटी'! एका व्हायरल व्हिडिओने रिक्षा नाक्यावर उडवून दिली खळबळ

viral auto story : सामान्य रिक्षाचालक भूमकर काकांचा एका व्हायरल व्हिडिओमुळे झालेला 'सेलिब्रिटी' प्रवास आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या आयुष्यात उमटणारे आनंदाचे तरंग दर्शवणारा हा हृदयस्पर्शी कथाभाग.
viral auto story

viral auto story

esakal

Updated on

मानसी होळेहोन्नूर

कोणी नायिका आपल्या रिक्षात बसली होती, हे भूमकर विसरूनही गेले होते. पल्लवीचे खरे नाव काय हेही त्यांना माहीत नव्हते, पल्लवी तिचे मालिकेतले नाव होते. तिने स्कार्फ न काढताच व्हिडिओ केला होता. भूमकरांनी त्यांच्याच रिक्षाचा व्हिडिओ अगदी प्रेमाने पाहिला. आपली गोष्ट दुसऱ्यांच्या नजरेतून बघताना वेगळी वाटते, त्यातही जर त्या दुसऱ्या नजरेत प्रेम असेल, तर आपल्या गोष्टीवरचे आपले प्रेम अजून वाढते, असे त्या क्षणी भूमकरांना वाटले.

भूमकर गाडीतून उतरायच्या आधीच जाधव, काळे, मानकर, सत्तार सगळ्यांनी त्यांना गराडा घातला.

‘‘काय भूमकर, एकदम सिलिब्रिटी झाला ना राव तुम्ही.’’ जाधव त्यांच्या खांद्यावर हात टाकत म्हणाले.

भूमकरांना काहीच कळेना. हातात कॉफीचा ग्लास घेऊन त्यांच्या रिक्षात बसलेल्या एका फिमेल पॅसेंजरला आरटीओजवळ सोडून ते थेट इकडे नाक्यावर आले होते. त्या बाईंची गाडी उचलली होती, नो पार्किंगमध्ये लावली होती म्हणून. आता यात फेमस होण्यासारखे काय होते? बरे त्याआधी कोणाची पर्स, बॅग राहिली आणि ती परत केली असेही काही आज दिवसभरात झाले नव्हते किंवा कोणालातरी रस्त्यात चक्कर आली, काही त्रास झाला म्हणून मदत केली असेही काही झाले नव्हते. त्या फिमेल पॅसेंजरने गाडीतला स्वामींचा फोटो पाहून नमस्कार केला आणि काहीतरी पुटपुटली, पण त्यामुळे एकदम फेमस कसे झालो आपण, हेच भूमकरांना कळतच नव्हते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com