

NCERT textbook controversy
esakal
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तयार केलेल्या इयत्ता आठवीच्या समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकातील न्यायव्यवस्थेमधील भ्रष्टाचारासंदर्भातील धड्यावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्याची घटना नुकतीच घडली. न्यायालयाने सर्व छापील प्रती जप्त करण्याचे व डिजिटल प्रती हटविण्याचे आदेशही दिले. या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली व असा धडा समाविष्ट केल्याबद्दल संताप व्यक्त केला. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आधी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती, मात्र न्यायालयाचे ताशेरे ऐकल्यानंतर त्यांनी संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले.