

Wife is not a servant
esakal
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक आदेश देऊन पत्नी ही घरातली नोकर किंवा मोलकरीण नसून, जीवनसाथी आहे असे स्पष्ट केले! घरकाम आणि स्वयंपाक करणे ही केवळ पत्नीची जबाबदारी नाही, पतीने घरकामात मदत करणे किंवा पत्नीच्या कामाला हातभार लावणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने सुनावले आहे. घटस्फोटासंबंधीच्या एका प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने वैवाहिक नातेसंबंधांत अत्यंत महत्त्वाचे मत नोंदवत पतीने केलेले सर्व दावे फेटाळून लावले आहेत. पत्नी घरातील नोकर नाही, लग्न हे मालक-नोकर संबंध नसून ती समान भागीदारी आहे, पत्नीला घरकामाचे मशिन समजणे चुकीचे आहे, अशा अनेक गोष्टी या निकालात न्यायालयाने स्पष्ट केल्या आहेत.