संपादकीय
वैष्णवी नावाची ‘ती’ मुलगी. या नावामागे एक विलक्षण वेदना दडली आहे. तिचं शिक्षण, तिचं आत्मभान, तिच्या उंबरठ्यावर थांबलेली स्वप्नं... हे सगळं कुठल्यातरी एका संवेदनशील मुलीचं वैयक्तिक दुःख नाही. ही लाखो ‘ती’ म्हणविणाऱ्या स्त्रियांची खोलवर अस्वस्थ करणारी कथा आहे. ओठातून शब्दांच्या रूपाने कधीच बाहेर येत नाही, पण डोळ्यांतून वाहणारे अश्रू खूप काही बोलून जातात; तर कधी उदास चेहऱ्यावरची निराशा अबोलपणे सगळं काही सांगून जाते.