

Golden Shower Tree India
esakal
डॉ. मंदार दातार
बहावा मूळचा आपल्याकडच्या कोरड्या, पानझडी जंगलांमधला. आपल्या मुलखात शिशिर-वसंतात झाडांची पाने गळून पडतात, तेव्हा कोरड्या, रुक्ष, तपकिरी रंगाच्या आसमंताच्या आणि नितळ निळ्या अवकाशीच्या पार्श्वभूमीवर बहाव्याची ‘सोनवर्खिली झुंबरे’ परागीभवन करणाऱ्या कीटकांना अगदी लांबूनही स्पष्ट दिसतात.
अमलताश किंवा बहावा... एकेकाळी केवळ जंगलात वाढणाऱ्या आणि जंगलात भटकणाऱ्या फारच मोजक्या दीदावरांना दर्शन देणाऱ्या या सुवर्णवृक्षाला शहरांतील रस्त्यांच्या कडेला आणि बागांमध्ये हक्काचे स्थान मिळाले, तेव्हापासून त्याच्या देखण्या रूपाने जनमानसावर विलक्षण गारुड केले आहे. साधारण मार्च-एप्रिलमध्ये बहावा फुलला, की तो जिथे लावला आहे ते रस्ते, त्या जागा अक्षरशः सोनसळी रंगात न्हाऊन निघतात. हिंदीत त्याला अमलताश म्हणतात आणि संस्कृतातले कर्णिकार हे त्याचे आणखी एक नाव. कर्णिकार म्हणजे कानांतील दागिना. बहाव्याच्या फुलांचे घोस कानातल्या डुलासारखे खाली लोंबतात, म्हणून त्याला हे नाव पडले असावे. कालिदास त्याच्या ऋतुसंहारात या वृक्षाचा उल्लेख करतो,