Premium|Ebola outbreak alert India : लस अन् औषधही उपलब्ध नाही; २६० हून अधिक बळी घेणाऱ्या इबोलामुळे जागतिक आणीबाणी घोषित

Difference Between Global Pandemic and Health Emergency : कांगो आणि युगांडाच्या सीमावर्ती भागात पसरलेल्या, औषध किंवा लस उपलब्ध नसलेल्या ‘बुंडिबुग्यो इबोला’ विषाणूच्या सतराव्या उद्रेकामुळे जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केल्याने मोठी चिंता निर्माण झाली आहे.
Difference Between Global Pandemic and Health Emergency

Difference Between Global Pandemic and Health Emergency

esakal

Updated on

डॉ. प्रदीप आवटे

पश्चिम आफ्रिकेत अवघ्या सहा, सात महिन्यांच्या अंतराने इबोला पुन्हा आला आहे. त्याच्याबद्दलची भीती एवढी सर्वव्यापी आहे, की १९९५मध्ये वोल्फगॅंग पीटरसनने इबोलासदृश मोटाबा या काल्पनिक आजारावर ‘आउटब्रेक’ नावाची हॉलिवूड फिल्म तयार केली. डस्टीन हॉफमन या नामवंत अभिनेत्याने त्यात प्रमुख भूमिका केली आहे. या चित्रपटाने इबोलाची ही भीती अत्यंत भेदकपणे सर्वदूर पोहचविली. मात्र, तो निव्वळ पडद्यावर नाही, तर प्रत्यक्षात डेमॉक्रेटिक रिपब्लिक ऑफ कांगोमध्ये त्याचा १७ वा उद्रेक झाला आहे.

महत्वाचे म्हणजे, कांगो आणि युगांडा या देशात सध्या सुरू असलेल्या इबोला उद्रेकास जागतिक आरोग्य संघटनेने सार्वजनिक आरोग्याची आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. तथापि ही जागतिक महामारी (पॅन्डेमिक) नाही, हेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमनानुसार आरोग्यासंदर्भात एखादी अनपेक्षित घटना घडली, तिचा आरोग्यक्षेत्रावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असेल आणि आंतरराष्ट्रीय प्रसाराच्या शक्यतेमुळे दळणवळणावर निर्बंध लादण्याची वेळ येत असल्यास जागतिक आरोग्य संघटना त्याला आरोग्यविषयक आणीबाणी म्हणते. साधारणपणे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात या उद्रेकाची सुरुवात झाली असावी. या उद्रेकात आतापर्यंत १२०५ संशयित रुग्ण आढळले असून, त्यापैकी २६४ जणांचा मृत्यू झाला आहे.

सध्या सुरू असलेला इबोला उद्रेक हा बुंडिबुग्यो या उपप्रकारामुळे उद्भवलेला आहे. या विषाणू प्रकाराविरुद्ध कोणतेही औषध किंवा लस उपलब्ध नाही. कांगोच्या उत्तरेकडील इटुरा या प्रांतात या उद्रेकाची सुरुवात झालेली आहे. हा प्रांत युगांडा, सुदान या देशाचा सीमावर्ती भाग असल्याने हा संसर्ग नव्या देशांमध्ये शिरकाव करण्याची शक्यता वाढली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com