

Summer kids snacks
esakal
साहित्य
एक कप आंब्याचा रस, २ टेबलस्पून साखर, १ कप पाणी, स्ट्रॉबेरी व द्राक्षाच्या फोडी.
कृती
ब्लेंडरमध्ये आंब्याच्या फोडी, साखर व पाणी घालून ब्लेंड करून घ्यावे. मग पॉप्सिकल मोल्डमध्ये स्ट्रॉबेरी व द्राक्षाच्या फोडी घालाव्यात. त्यात ब्लेंड केलेला आंब्याचा रस घालून मिश्रण आठ तास फ्रिझरमध्ये सेट करायला ठेवावे. आठ तासांनंतर आंब्याचे पॉप्सिकल्स अनमोल्ड करून थंडगार सर्व्ह करावेत.
साहित्य
एक कप किवी, २ टेबलस्पून साखर, १ कप पाणी, किवी व स्ट्रॉबेरीचे तुकडे.
कृती
ब्लेंडरमध्ये किवीच्या फोडी, साखर आणि पाणी घालावे व मिश्रण ब्लेंड करावे. पॉप्सिकल मोल्डमध्ये स्ट्रॉबेरी व किवी स्लाइस घालून त्यावर किवीचा ब्लेंड केलेला रस घालावा व आठ तास फ्रिझरमध्ये सेट होऊ द्यावे. त्यानंतर थंडगार किवी पॉप्सिकल्स अनमोल्ड करून खायला द्यावेत.