Premium|Childhood Summer Memories : नेमेची येतो मग... उन्हाळा!

Rural India Nostalgia : भोरमधील आजोळच्या जुन्या वाड्यातील आंब्याची अढी, सायकलची रपेट, कंदील-चिमण्यांचा मंद प्रकाश आणि बालपणीच्या उन्हाळी सुट्टीत अनुभवालेला गदिमांच्या कवितांसारखा रसाळ काळ आजही मनाच्या कोपऱ्यात ताज्या आठवणींच्या रूपाने साठवलेला आहे.
Childhood Summer Memories

Childhood Summer Memories

esakal

Updated on

प्रभाकर बोकील

उन्हाळ्याच्या सुट्टीत आठवडाभर भोरला आजोळी राहिल्याची आठवण आजही ताजी आहे. ‘जेथे दया, क्षमा, शांती तेथे देवाची वसती’ अशी सुभाषितं भिंतींवर असलेल्या आजोबांच्या घरामागच्या परसात डावीकडच्या बाजूला साठवणीची खोली होती, ती प्रसंगी बाळंतिणीची खोली असायची. त्या खोलीत सीझनमध्ये जमिनीवरच रायवळ वा गोटी आंब्यांचे ढीग साठवले जायचे, माळ्यावर आंब्याची अढी घातलेली असायची. त्या खोलीत बसून मनसोक्त आंबे चोखून खाण्याची मुलांमध्ये पैज लागायची!

‘‘आई, लिबाला मोहर आला!’’ बाळ अत्यानंदानं आईला सांगतो.

‘‘फाल्गुन सरला, आता लिंबं मोहरायचीच, परवा तर पाडवा!’’ आई सांगते.

दिसादिसांनी उन्हाळा वाढू लागतो. बाळला शाळेत जायचा कंटाळा येतो. आई त्याला गावदरी शेतातली दृश्यं दाखवते. भर उन्हात शेतकऱ्यांचे नांगर चाललेले असतात. बैलांची तोंडं फेसाळलेली असतात. शेतकऱ्यांच्या अंगावर घामाचे लोट असतात... ‘काम करत राहिलं पाहिजे...’ आई बाळला समजावून सांगत असते. बाळ शाळेला जाण्यात अळमटळम करत नाही. विझत्या चैत्रावर वारा फुंकर मारू लागतो आणि वैशाख अधिकच जळजळू लागतो. गावचा कुंभार घरोघर गार पाण्यासाठी डेरे पोहोचवतो. घरात धान्याची टंचाई जाणवू लागते. कणगी तळाला पोहोचलेल्या असतात. हिरव्या भाजीचा दुष्काळ होतो...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com