Premium|Nutritious Paratha Recipes : नाश्त्याला तेच तेच खाऊन कंटाळलात? तुरीच्या दाण्यांपासून मशरूमपर्यंत बनवा 'हे' ८ प्रकारचे पौष्टिक पराठे

Indian Breakfast Ideas : थंडीच्या दिवसांत तुरीचे दाणे, सोयाबीन, मशरूम आणि विविध भाज्यांचा वापर करून बनवलेले पौष्टिक आणि चविष्ट पराठे आरोग्यासाठी उत्तम ठरतात. घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणाऱ्या या वैविध्यपूर्ण पराठ्यांच्या खास रेसिपीज खास खवय्यांसाठी.
Nutritious Paratha Recipes

Nutritious Paratha Recipes

esakal

Updated on

मीनाक्षी काटकर

तुरीच्या दाण्यांचा पराठा

साहित्य : दोन मोठ्या वाट्या कणीक, २ वाट्या तुरीचे ओले दाणे, ७ ते ८ हिरव्या मिरच्या, वाटीभर चिरलेली कोथिंबीर,

१ वाटी चिरलेला कांदा, १ चमचा लसूण पेस्ट, १ वाटी तेल, प्रत्येकी

१ चमचा धने पूड, जिरे पूड, हळद, मीठ, जिरे, लाल तिखट, मोहरी, गरजेनुसार पाणी.

कृती : सर्वप्रथम कणीक मळून घ्यावी. तुरीचे दाणे व हिरव्या मिरच्या भाजून मिक्सरमध्ये फिरवून घ्याव्यात. कढईत तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरे, मोहरी, कांदा, लसूण पेस्ट, हळद, तिखट, धने व जिरे पूड घालून परतावे. नंतर त्यात तुरीच्या दाण्यांचे व मिरचीचे वाटण घालून नीट परतावे व झाकण ठेवून मंद आचेवर शिजू द्यावे. मिश्रण थंड झाले की ते पुरणासारखे कणकेच्या गोळ्यात भरून पराठा लाटून घ्यावा व तेल लावून खरपूस भाजून घ्यावा. लोणचे किंवा दह्याबरोबर पराठा सर्व्ह करावा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com