Premium|Tribal Culture Tourism : वारली लोकपरंपरेची विलोभनीय अनुभूती...

Traditional Warli art and tribal culture festival in Palghar Maharashtra : पालघरमधील डहाणू, घोलवड आणि गंजाड येथे पार पडलेल्या 'मातीच्या रंगांचं संमेलन' या अनोख्या लोकोत्सवात वारली चित्रकला, तारपा नृत्याचा जोष आणि पारशी संस्कृतीचा जिव्हाळा अनुभवत आदिवासी वारशाचे विलोभनीय दर्शन घडले.
Traditional Warli art and tribal culture festival in Palghar Maharashtra

Traditional Warli art and tribal culture festival in Palghar Maharashtra

esakal

Updated on

तारपाची अनोखी धून आणि समुद्राच्या नैसर्गिक रंगमंचावर सादर झालेलं नृत्य, भिकल्या दादांचा वादनाचा जोष मनात साठवून आम्ही मुक्कामाला तपोवनमध्ये पोहोचलो. एव्हाना कडकडून भूक लागली होती. इथले प्रसिद्ध बोंबील मासे, फिश करी, तांदळाची टम्म फुगलेली शुभ्र भाकरी, फक्कड वरणाची डाळ आणि वाफाळता उकडा भात असा यथेच्छ बेत होता. जेवणानंतरचा गोड पदार्थ म्हणून इथली मस्त वेलची केळी होती. तृप्त झालो आणि सुशेगात झोपी गेलो.

डहाणूतून बोर्डीच्या दिशेनं निघालो. मुंबईपासून दोन-तीन तासांवर असलेलं हे ठिकाण. महानगरातल्या घरांच्या खुराड्यातून थेट पायवाटेवर प्राजक्ताचा सडा शिंपावा तसा सुगंधित, मनमोहक प्रदेश. झाडांच्या गर्द कॅनोपीतून वळणवाटा घेणारी लफ्फेदार वाट, झाडं, चिकूंनी लगडलेल्या बागा मागं सरत होत्या. आम्ही बोर्डीत पोहोचलो आणि तिथून त्याच्यालगत खेटून असलेल्या घोलवड गावात! एव्हाना सूर्य मावळतीकडं कलू लागला होता. स्वातंत्र्य चळवळीचं स्मरण करणारा एक स्मृतिस्तंभ वाटेत लागला, त्याला वळसा घातला आणि आम्ही पोहोचलो ‘तपोवन’ या दीडशे वर्षं जुन्या पारशी घरात. वृक्षराजीत लपलेलं आपल्याच नादात असलेलं हे ऐटबाज घर आमचं स्वागत करायला उभं होतं. अमिताव दादांनी तर बजावून ठेवलं होतंच ‘जैसे भी पहूँच जाएंगे, बीचपर जल्दी आना है ।’ दादांचा हा आदेश शिरसावंद्य मानून लगोलग पोहोचलो घोलवडच्या दर्याकिनाऱ्यावर.

आकाशातल्या रंगछटा तांबूस लालेलाल होत चाललेल्या. या संधिप्रकाशाच्या फिकट लाल खेळात किनाऱ्यावरच्या वाळूत आदिवासी स्त्री-पुरुष फेर धरून एकमेकांच्या कमरेत हात घालून, खांद्याला खांदा लावून गोलाकार फेर करून नाचत होते. झोकदार लयीत नृत्य सुरू होतं. या नर्तकांच्या गोलाकार मेळ्यात मध्यावर एक वादक अत्यंत सुंदर लयीत भान हरपून ‘तारपा’ वाद्य वाजवत होता. वाद्याची लय जसजशी बदलत गेली, तसतशी नर्तकांची पावलं त्याच्या लयीच्या-सुरांच्या ठेक्यावर फेर धरू लागली. कधी गतिमान तर कधी संथ लयीत आदिवासीचं हे समूहनृत्य मावळत्या लालगर्द सूर्याच्या गोळ्याला साक्षी ठेवून आसमंतात जणू सूर-लयीचं प्रकाशनाट्य साकारत होतं. मनाचा ठाव घेत होतं. नुकताच पद्मश्री सन्मान प्राप्त झालेले भिकल्या लाडक्या धिंडा भान हरपून तारपा वाजवत होते. लहानग्या वयातच वडिलांकडून हे वाद्य परंपरेनं त्यांच्या हाती आलं. आज वयाच्या ९२व्या वर्षीही त्याच तडफेनं ते तारपा वाजवतायत, आदिवासी संस्कृतीचं हे प्रतीक त्यांनी जगभर पोहोचवलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com