

Seasonal changes in nature
esakal
दीपाली ठाकूर
चैत्रातील वासंतिक हवेतल्या अल्लड उबदारपणाचं रांगणं जाऊन हळूहळू उन्हं अंग धरू लागली की समजून जावं, वैशाखवणवा ग्रीष्माची वर्दी देत कधीही दाराशी येऊन ठेपेल. ‘मी’ म्हणू पाहणारं ऊन ऐन
तारुण्याच्या कैफात येणाऱ्या मीपणाची आठवण करून देऊ लागतं. आग ओकणाऱ्या सूर्यामुळे सहजपणे नावापुढे तापट म्हणून शिक्कामोर्तब केलं जात असताना मला मात्र ग्रीष्म ‘प्रगल्भ’ वाटतो.
पुनरपि ग्रीष्मी तीच काहिली
मेघावली नभी पुनरपि आली...
नरपि म्हणजे कितवी वेळ असेल ही? अनादि, अनंत काळाचा एक छोटासा अंश असेल ती! तरीही त्या प्रत्येक वेळी सृष्टी ज्या दृश्य-अदृश्य स्थित्यंतरातून गेली असेल, ते स्थित्यंतर म्हणजे ऋतू!