
निकिता कातकाडे
फॅशन बदलत असते, ट्रेंड्स येतात-जातात पण फुटवेअरचे काही प्रकार असे असतात, की ते वर्षानुवर्षं मनात घर करून राहतात; कधी कम्फर्टमुळे, कधी सवयीमुळे, तर कधी आठवणींमुळे. कॅनव्हास शूजपासून ते कोल्हापुरी चपलेपर्यंत, क्रॉस स्ट्रॅप सँडल्सपासून ते फॉर्मल बुटांपर्यंत प्रत्येक फुटवेअरची आपल्या मनावर एक स्वतंत्र छाप असते. कधी ऑफिसची धावपळ, कधी पावसातली सैर, कधी ट्रेकिंगचा थरार, तर कधी राजेशाही पोशाख, प्रत्येक वेळी आपण त्या क्षणाला साजेसं फुटवेअर शोधत असतो. त्या शोधातूनच काही फुटवेअर्स पायांत आणि मनातही फिट बसतात. ‘क्लसिक’ म्हणता येतील असे फुटवेअरचे काही ऑल टाइम फेव्हरेट प्रकार!