

Third Eye Book
esakal
वर्षा वासुदेव
‘तिसरा डुळा’ कथा वाचताना तर वाटलं, एखादा सुंदर इराणी किंवा मल्याळी चित्रपट पाहतेय. निरागस, गोड म्हादू डोळ्यासमोर उभा राहत होता. त्यानं कायम असंच ‘सच्चं’ राहावं असं वाटलं. पण तो नायक नव्हता, तो फक्त एक पात्र होता. कथेतलं म्हादूचं बदललेलं रूप बघून, भोपाळहून मुंबईला परतताना ट्रेनच्या दरवाजात बसलेला एक २६-२७ वर्षांचा मुलगा दिसला होता, अगदी तोच आला माझ्या डोळ्यासमोर.