फूडपॉइंट, मीनाक्षी काटकर
आमटीचे प्रकार
वाढप
२ ते ३ व्यक्तींसाठी
साहित्य
एक वाटी खसखस, ५ ते ६ भाजलेल्या हिरव्या मिरच्या व लसूण यांची पेस्ट, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, धने-जिरे पूड, हळद, मीठ, १ मोठा चमचा तेल, ५ ते ६ कढीलिंबाची पाने, मोहरी, ३ वाट्या गरम पाणी.
कृती
खसखस चार तास पाण्यात भिजवून नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावी. कढईत तेल गरम करून त्यात मोहरी तडतडू द्यावी. नंतर मिरची-लसूण पेस्ट आणि कढीलिंब पाने घालून चांगले परतावे. त्यानंतर हळद, धने-जिरे पूड, आणि दाण्याचे वाटलेले मिश्रण घालून हलवावे. मग त्यात चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मंद आचेवर शिजू द्यावे. आमटीला चांगली उकळी आल्यावर वरून कोथिंबीर घालावी. खसखशीची गरमागरम आमटी भाकरीसोबत खाण्यास द्यावी.