

Leaf Vadi Recipes
esakal
वाढप - ५ ते ६ व्यक्तींसाठी.
साहित्य - दहा ते बारा वावडिंगाची पाने, पाव वाटी चणा डाळीचे पीठ,
a१ बारीक चिरलेला कांदा, १ चमचा धने व जिरे पूड, पाव चमचा मोहरी, १ वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, ५ ते ६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, ४ ते ५ बारीक चिरलेल्या लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ, गरजेनुसार तेल व पाणी.
कृती
वावडिंगाची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत. चणा डाळीचे पीठ, लसूण व हिरव्या मिरचीची पेस्ट, धने व जिरे पूड, हळद, मीठ एकत्र करावे. त्यात गरजेनुसार पाणी घालून भजीच्या पिठासारखे पीठ करावे. पानांवर हे बेसनाचे पीठ लावून एकावर एक तीन-चार पाने ठेवून घडी करावी व कुकरमध्ये शिट्टी करून वाफवावी. पाने थंड झाल्यानंतर वड्या कापाव्यात. आता एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, कांदा, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या घालून फोडणी करावी. ही फोडणी वड्यांवर घालून वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. वावडिंगाच्या वड्या तयार.