

Traditional Shankarpali Recipe
esakal
अस्मिता पोकळे
दिवाळीच्या फराळाच्या ताटात गोड आणि तिखट पदार्थांची जुगलबंदी असते. त्यातही खुसखुशीत शंकरपाळ्यांवर आबालवृद्ध तुटून पडतात. फक्त फराळातच नव्हे, तर चहाबरोबरही शंकरपाळे भाव खाऊन जातात. असेच काही शंकरपाळ्यांचे प्रकार...
साहित्य
दोन कप मैदा, १ कप साखर, अर्धा कप तूप, अर्धा कप दूध, चिमूटभर मीठ, अर्धा चमचा वेलची पूड, तळण्यासाठी तेल.
कृती
प्रथम दुधात साखर विरघळवून घ्यावी. मैद्यात तूप, मीठ आणि वेलची पूड घालून मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. मग त्यात साखरेचे दूध घालून घट्टसर पीठ मळावे. आता हे पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे. या पिठाची मध्यम जाडीची पोळी लाटून शंकरपाळ्यांच्या आकारात कापावी. कढईत तेल गरम करून शंकरपाळे मंद ते मध्यम आचेवर कुरकुरीत होईपर्यंत तळावेत.
साहित्य
दोन कप मैदा, २ कप रवा, ४ चमचे तूप, चवीनुसार मीठ, १ चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा मिरची पावडर, गरजेनुसार पाणी, तळण्यासाठी तेल.
कृती
मैद्यामध्ये रवा एकत्र करून त्यात मीठ, जिरे, ओवा आणि मिरची पावडर घालावी. या मिश्रणात गरम तूप घालून चांगले एकजीव करावे. पाणी घालून घट्ट पीठ मळावे. हे पीठ १५ ते २० मिनिटे झाकून ठेवावे. आता पिठाची जाडसर पोळी लाटून शंकरपाळे कापावेत. कढईत तेल गरम करून त्यात मंद ते मध्यम आचेवर शंकरपाळे सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळावेत.