

How to publish a book in Marathi
esakal
स्वतःचं पुस्तक प्रकाशित करावं अशी अनेकांची इच्छा असते. पुस्तकाचा विषय सुचतो, त्याप्रमाणे लिहूनही होतं... पण त्यापुढं काय करायचं हे अनेकांना माहिती नसतं. पुस्तक प्रकाशित करणं ही एक प्रक्रिया आहे... म्हटलं तर सोपी, म्हटलं तर अवघड. या प्रक्रियेत सुलभता यावी म्हणून लेखकाला काही टिप्स देत आहोत. जेणेकरून पुस्तक प्रकाशित करताना सहजता येईल. तसेच ही निर्मिती प्रक्रिया समजून घेण्यास मदत होईल.
लेखकानं लिहिलेला मजकूर स्वतः तटस्थपणे वाचून फायनल करावा. जेणेकरून पुस्तक करताना त्याचा उपयोग होईल.