Premium|travel planning : भटकंतीचा आनंद वाढवण्यासाठी प्रवासाचं नियोजन का महत्त्वाचं?

Travel Planning Tips for a Stress-Free Journey : भटकंतीतून रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी वेळ मिळतो; मात्र प्रवासाचा आनंद वाढवण्यासाठी कुठे जायचे, काय घ्यायचे आणि सुरक्षिततेसह योग्य नियोजन करणे तितकेच महत्त्वाचे ठरते.
Travel Planning Tips for a Stress-Free Journey

Travel Planning Tips for a Stress-Free Journey

esakal

Updated on: 

भटकंती म्हणजे एखादं नवं ठिकाण पाहणं नाही, तर रोजच्या धावपळीतून स्वतःसाठी थोडा वेळ काढणं आणि नव्या अनुभवांनी मन समृद्ध करणं. मात्र प्रवास कितीही उत्साहात ठरवला, तरी त्यामागे योग्य नियोजन असेल तरच त्याचा खरा आनंद घेता येतो. कुठं जायचं, कधी जायचं, बरोबर काय घ्यायचं आणि सुरक्षिततेची कशी काळजी घ्यायची याचं नियोजन पक्कं असेल, तर प्रवास अधिक सुखकर होतो.

सकाळी सकाळी रेखाचा फोन आला - ‘‘अगं इजिप्तला जायचं ठरतंय आमच्या ग्रुपचं. मी जाऊ का गं? म्हणजे मला झेपेल का गं सगळं?’’ या रेखाला फिरायची भारी हौस, पण मनात प्रचंड भीती. चिंता करायची सवय असल्यामुळे कुठेही जायचं असलं, की आधी फोन करून मला विचारते, ‘मला झेपेल ना गं?’ मी तिला म्हणाले, ‘‘बिनधास्त जा. थोडं चालावं लागेल. पण नक्की जा. झेपेल तुला. इजिप्त आणि तिथली नाईल नदी फार सुंदर आहे. मुद्दाम पाहावा असा देश आहे.’’ मी तिला आश्‍वस्त केलं.

पर्यटन आयुष्यात आनंद घेऊन येणारा, जीवन समृद्ध करणारा, मनाच्या जाणिवांना नवचैतन्य देणारा अतिशय सुखद अनुभव आहे, असं माझं ठाम मत आहे. आजकाल प्रवास करणं काही अंशी सोपं झालंय हे खरं असलं, तरी उचलली बॅग आणि निघालो प्रवासाला इतकं ते सोपंही नक्कीच नाहीये. पर्यटनासाठी घराबाहेर पडायचं म्हणजे कितीतरी गोष्टींचा विचार करावा लागतो. हा सुखद अनुभव असला, तरी योग्य नियोजन न केल्यास कटू अनुभव ठरू शकतो. त्यामुळे पर्यटनाचा खरा आनंद घ्यायचा असेल, तर योग्य नियोजन आवश्‍यक आहे. हल्ली सर्व स्तरातील मंडळी पर्यटनासाठी वेळ काढतात. पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी असते. माझ्या इतक्या वर्षांच्या पर्यटनाच्या अनुभवातून साध्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या काही गोष्टी तुम्हाला सांगू इच्छिते. पुढच्यावेळी फिरायचा प्लॅन करताना या टिप्सचा नक्की विचार करा.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com