

Travel Sketching
esakal
महेंद्र कोंडेकर
प्रत्यक्ष जागेवर जाऊन चित्र रंगवणे केवळ चित्रकलेचा प्रकार नाही, तर ती जगण्याची एक पद्धत आहे, असे मला वाटते. चित्रकला मला थांबायला शिकवते, गोष्टी बारकाईने पाहायला शिकवते आणि प्रत्येक प्रवास अधिक अर्थपूर्ण करते. पर्यटक म्हणून आपण एखादे ठिकाण पाहतो, पण चित्रकार म्हणून मी ते अनुभवतो.
प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हे. प्रत्येक प्रवास आपल्याला नव्या अनुभवांची, नव्या माणसांची आणि नव्या जाणिवांची शिदोरी देतो. माझ्यासाठी प्रत्येक प्रवासाचा शेवट कॅमेऱ्यातील छायाचित्रांनी होत नाही, मी कागदावर रंगांच्या साहाय्याने माझा प्रवास रेखाटतो. यासाठी हातात स्केचबुक, काही ब्रश आणि रंगांचा छोटासा डबा एवढेच माझे सामान असते. ज्या ठिकाणी मन रमते, त्या ठिकाणी मी बसतो आणि त्या क्षणाला, जागेला, वास्तूंना रंगांत व चित्रांत बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो.