

Travel Beauty Kit
esakal
स्वप्ना साने
दिवसभर साइट सीइंग करून आल्यावर कितीही थकलेले असलात, तरी चेहऱ्यावरचा मेकअप क्लीन करून, चेहरा स्वच्छ धुऊन हायड्रेट करावा. त्यासाठी एकतर तुम्ही फेस सिरम वापरू शकता किंवा हायड्रेटिंग शीट मास्कही वापरता येईल. तुम्हाला जे सोयीचे असेल ते वापरावे. चेहऱ्याबरोबर हातापायांच्या त्वचेलादेखील बॉडी लोशन लावावे.
आता हळूहळू पर्यटनाचा सीझन सुरू होईल. या सीझनमध्ये खूपजण फिरायला जायचे प्लॅन्स करतात; परदेशात, दुसऱ्या राज्यात किंवा थोड्या दूरच्या शहरातही. उत्तर भारतात थंडी कमी असल्यामुळे तिकडेही पर्यटकांची गर्दी असते. बर्फाचे पहाड आणि निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण असले तरी काही ठिकाणी तापमान कमी असूनही उन्हाची तीव्रता जाणवते. म्हणूनच फिरायला जाताना आपल्या त्वचेची आणि केसांची काय काळजी घ्यावी हे पाहू या.
सर्वप्रथम तुम्ही किती दिवसांचा प्रवास करताय त्यानुसार तुमची इतर तयारी तर होईलच, पण बरोबर नेण्यासाठी कपडे आणि इतर तयारीच्या अनुषंगानेच ब्यूटी किटही तयार करावी.