सुप्रिया खासनीससाहित्यदोन वाट्या बारीक केलेले खारकांचे तुकडे, खारकांचे तुकडे बुडतील इतपत लिंबाचा रस, १ वाटी मनुके, अर्धी वाटी आल्याचा कीस, १ चमचा काळे मीठ, मीठ चवीनुसार, अर्धी ते एक वाटी साखर..कृतीसर्वप्रथम मनुके निवडून स्वच्छ धुऊन घ्यावेत. त्यानंतर एक स्वच्छ बरणी घेऊन त्यात लिंबाचा रस, खारकांचे तुकडे, मनुके आणि इतर सर्व साहित्य एकत्र घालावे. हे मिश्रण नीट हलवून, खाली-वर करून एकसारखे करावे. बरणी झाकून ठेवावी आणि मिश्रण मुरू द्यावे. मुरल्यावर हे लोणचे तयार होते..लिंबाचे तिखट लोणचेसाहित्यएक डझन लिंबे, २ चमचे हळद, २ चमचे मेथ्या, २ ते ४ चमचे तिखट, १ चमचा हिंग, पुरेसे मीठ.कृतीसर्वप्रथम थोड्या तेलावर मेथ्या हलका लालसर रंग येईपर्यंत परताव्यात आणि नंतर त्या बारीक वाटून घ्याव्यात. त्याच तेलात मोहरी घालून फोडणी तयार करावी. एका परातीत हळद, हिंग आणि तिखट एकत्र करून त्यावर ही फोडणी ओतावी. फोडणी पूर्णपणे गार होऊ द्यावी. लिंबाच्या फोडी करून त्यांना आवश्यकतेनुसार मीठ लावून थोडावेळ ठेवावे. नंतर त्यात वाटलेल्या मेथ्या, हळद-हिंग-तिखटाची फोडणी घालून मिश्रण एकत्र कालवावे. हे मिश्रण स्वच्छ बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे कधीही करता येते..ओल्या हळदीचे लोणचेसाहित्यएक वाटी ओल्या हळदीचे गोल तुकडे, ४ ते ५ ओल्या मिरच्या, मीठ, लिंबू, १ वाटी आल्याचे गोल तुकडे; पाव वाटी कुटलेली मोहरी-१ चमचा मेथ्या-१ चमचा हिंग एकत्र करून केलेला मसाला.कृतीओली हळद आणि आल्याचे गोलसर तुकडे एकत्र करून त्यावर तयार केलेला मसाला चोळावा. त्यानंतर त्यावर अंदाजाने लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घालावे. नंतर त्या मिश्रणात ओल्या मिरच्यांचे तुकडे घालावेत. शेवटी गार केलेली फोडणी त्यावर ओतावी. सगळे मिश्रण नीट कालवून एकसारखे करून घ्यावे आणि नंतर हे लोणचे स्वच्छ बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे चवीलाही छान लागते आणि योग्य प्रकारे साठवण केल्यास बराच काळ टिकते..आवळ्याचे लोणचेसाहित्यअर्धा किलो आवळे, अर्धी वाटी लोणच्याची लाल मोहरी, पाव वाटी लाल तिखट, २ चमचे मेथ्या, हिंग, पाव किलो गूळ अथवा साखर, फोडणीचे साहित्य.कृतीसर्वप्रथम आवळे स्टीलच्या किसणीवर किसून घ्यावेत. मोहरी बारीक वाटून थोड्याशा पाण्यात नीट फेटून घ्यावी. बदामी रंग येईपर्यंत मेथ्या तळून त्यांची पूड तयार करावी. त्यानंतर एका भांड्यात गूळ किंवा साखर, लाल तिखट, किसलेले आवळे, मेथ्यांची पूड, फेटलेली मोहरी आणि चवीनुसार मीठ घालून सर्व साहित्य चांगले एकत्र कालवावे. नंतर अर्धी वाटी तेल गरम करून त्यात हिंग आणि हळद घालून फोडणी करावी व ती ह्या मिश्रणावर ओतावी. संपूर्ण मिश्रण थंड झाल्यावर स्वच्छ बरणीत भरावे आणि वरून थोडे मीठ घालून झाकून ठेवावे..आल्याचे गुलाबी लोणचेसाहित्यकोवळे आले, लिंबू, मीठ, फोडणी ऐच्छिक.कृतीकोवळ्या आल्याच्या चकत्या कराव्यात. त्यावर गरजेप्रमाणे लिंबू पिळावे व चवीनुसार मीठ घालावे. काही वेळाने त्याला नैसर्गिक गुलाबी रंग येतो. हवी असल्यास बिना हळदीची मोहरीची फोडणी घालावी. हे लोणचे करायला सोपे आणि चवीला लज्जतदार आहे.पथ्य लोणचेसाहित्यअर्धी वाटी आले, अर्धा चमचा मिरे, पाव वाटी ओली हळद किंवा ओली आंबेहळद, चवीनुसार सैंधव मीठ, अर्ध्या लिंबाचा रस.कृतीआल्याचे व आंबेहळदीचे बारीक तुकडे किंवा कीस करावा. गरजेप्रमाणे मिरे वाटून पूड करावी. सर्व साहित्य एकत्र करून चवीनुसार लिंबाचा रस व मीठ घालावे..पेरूचे लोणचेसाहित्यदोन पेरू, एका लिंबाएवढा गूळ, तिखट, मीठ, ४ ते ५ मेथ्या, २ चमचे दाण्याचे कूट.कृतीसर्वप्रथम पेरूच्या बेताच्या आकाराच्या फोडी करून घ्याव्यात आणि त्या पाण्यात घालाव्यात. त्यानंतर तेल गरम करून त्यात हिंग, हळद आणि मेथ्या घालून फोडणी करावी. या फोडणीत थोडे पाणी घालून त्यात पेरूच्या फोडी शिजवाव्यात. फोडी शिजल्यानंतर त्यात तिखट, मीठ, गूळ व दाण्याचे कूट घालून नीट कालवावे आणि गॅस बंद करावा. हे लोणचे खूप चविष्ट लागते आणि २ ते ३ दिवस टिकते..कांद्याचे लोणचेसाहित्यएक वाटी उभा चिरलेला कांदा, २ चमचे मोहरी डाळ, पाव चमचा मेथ्या, १ चमचा मोहरी, अर्धा चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, मीठ चवीनुसार, अर्धी वाटी लिंबाचा रस, हिंग, अर्धी वाटी तेल, फोडणीसाठीचे साहित्य.कृतीएक वाटीभर उभा चिरलेला कांदा घ्यावा. मेथ्या बदामी रंगावर खरपूस तळून घ्याव्यात आणि मग त्या व मोहरी एकत्र वाटून घ्यावी. त्यानंतर फोडणी करून ती गार होऊ द्यावी. नंतर सर्व साहित्य एकत्र मिसळून घ्यावे. त्यात कांद्याच्या फोडी आणि लिंबाचा रस घालून सर्व मिश्रण नीट एकजीव होईपर्यंत कालवावे व बरणीत भरावे..रसलिंबूसाहित्यएक वाटी लिंबाचा रस, पाव किलो गूळ, ४ ते ५ चमचे मोहरी, तेल, ४ चमचे लाल तिखट, २ चमचे मेथ्या, मीठ चवीनुसार, २ चमचे हळद, २ ते ४ दालचिनीचे बारीक तुकडे, १५ ते २० मिरे.कृतीगुळाचा पक्का पाक करून घ्यावा आणि तो पूर्णपणे गार होऊ द्यावा. पाक गार झाल्यावर त्यात लिंबाचा रस मिसळावा. मोहरी आणि मेथ्या हलक्या भाजून त्यांची बारीक पूड करावी. मिरीचीही पूड करून घ्यावी. लाल तिखट, हळद आणि थोडेसे तेल एकत्र करून मंद आचेवर परतून घ्यावे. नंतर मोहरी, मेथ्या, मिरी पूड, तिखट, हळद, दालचिनी पूड आणि मीठ हे सर्व जिन्नस एकत्र करून तयार मसाला गुळाच्या पाकात घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून बरणीत भरून ठेवावे. मुरण्यासाठी साधारण ४ ते ५ दिवस लागतात. रसलिंबू अतिशय चविष्ट लागते..Premium|Gender Equality : चौकटीत अडकवलेल्या मुली....हिरव्या मिरच्यांचे लोणचेसाहित्यदोनशे ग्रॅम हिरव्या मिरच्या, पाचशे ग्रॅम मोहरीची डाळ, १ चमचा हळद, १ चमचा मेथ्या, १ चमचा हिंग, अर्धी वाटी मीठ, अर्धी वाटी तेलाची फोडणी, २ लिंबे.कृतीसर्वप्रथम मोहरीची डाळ नीट कुटून घ्यावी. थोड्याशा तेलावर मेथ्या हलक्या परतून घ्याव्यात आणि त्यांची बारीक पूड करावी. त्यानंतर मीठ, हळद, हिंग, मेथ्यांची पूड, मोहरी पूड आणि मध्यम आकाराच्या चिरलेल्या मिरच्यांचे तुकडे एकत्र करावेत. या मिश्रणावर गार फोडणी ओतावी. नंतर त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण नीट एकजीव होईपर्यंत कालवावे. तयार मिश्रण स्वच्छ बरणीत भरून ठेवावे. साधारण ४ ते ५ दिवसांनी हे लोणचे खाण्यासाठी तयार होते. मधूनमधून लोणचे हलवत राहावे. योग्य देखभाल केली तर हे लोणचे जवळपास वर्षभर टिकू शकते.(सुप्रिया खासनीस चिंचवडस्थित फूड ब्लॉगर आहेत.).सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.