

Sant Dnyaneshwar Palkhi Sohala
esakal
रामेश्वर रंगनाथ महाराज उखळीकर
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाच्या फड परंपरांमध्ये परभणी जिल्ह्यातील वै. जनार्दनबुवा वासुदेवबुवा उखळीकर यांच्या उखळीकर दिंडीला श्रीसंत ज्ञानोबारायांच्या पालखी सोहळ्यामध्ये विशेष स्थान आहे. सन १८३२पासून अखंडपणे सुरू असलेली ही परंपरा आज सातव्या पिढीपर्यंत अविरतपणे पोहोचली आहे. माउलींच्या सेवेत स्वतःला अर्पण करत वारीचा वारसा जपण्याचे कार्य मालक वैकुंठवासी श्रीगुरू रंगनाथ महाराज उखळीकर यांनी केले आहे, आणि तोच वारसा सद्यःस्थितीतही बाळासाहेब महाराज उखळीकर, बापूसाहेब महाराज उखळीकर पुढे नेत आहेत.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील मानाच्या दिंड्यांमध्ये परभणी येथील जनार्दनबुवा वासुदेव उखळीकर यांच्या दिंडीचा विशेष मान आहे. १८३२पासून सुरू झालेली ही दिंडी सात पिढ्यांपासून अखंडपणे वारीची परंपरा जपत आहे. वारकरी संप्रदायातील भक्ती, सेवा, शिस्त आणि सामूहिक साधनेचा वारसा जपणाऱ्या या फडाने काळाच्या ओघातही आपली ओळख कायम राखली आहे.