

Equal Earth Projection and World Map Distortion
esakal
डॉ. श्रीकांत कार्लेकर
समान-क्षेत्रफळ दर्शवणाऱ्या इक्वल अर्थ प्रक्षेपणाचा प्राथमिक उद्देश दृश्यसमानता हा आहे. हे प्रक्षेपण सर्व खंडांच्या खऱ्या सापेक्ष क्षेत्राचे अचूक निर्देशन करते. या प्रक्षेपणात देशांचे आकार किंचित संकुचित होतात, परंतु संपूर्ण पृथ्वीवर पृष्ठभागाचे क्षेत्रफळ प्रमाणात राहते. त्यामुळे प्रत्यक्षात आफ्रिका खंड ग्रीनलँडपेक्षा १४पट आणि रशियापेक्षा ८२ टक्के मोठे असल्याचे दिसून येते.
ता. ४ सप्टेंबर २०२६ रोजी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ‘नकाशा दुरुस्त करा’ (करेक्ट द मॅप) असा ऐतिहासिक ठराव मंजूर केला. १६व्या शतकातील मर्केटर प्रक्षेपणातील गंभीर भौगोलिक विपर्यास किंवा विकृती (Distortion) दूर करण्यासाठी हा ठराव मांडण्यात आला. भारत आणि आफ्रिकन युनियन सदस्य राष्ट्रांसह अनेक राष्ट्रांनी या निर्णयाकडे भौगोलिक समानता, प्रतिनिधित्व आणि युरो-केंद्रित नकाशा शास्त्रापासून दूर जाण्याच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले आहे. अमेरिकेने या ठरावाच्या विरोधात एकमेव मत दिले आणि हा ठराव अनावश्यक व संयुक्त राष्ट्रांच्या मुख्य प्राधान्यक्रमांच्या बाहेरील एक वैचारिक प्रकल्प असल्याची टीका केली.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!
आजच सकाळ ॲप डाउनलोड करा