डॉ. राजीव जोशी
मेडिको-लीगल हा आजच्या वैद्यकीय व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. डॉक्टरांनी केवळ रुग्णसेवाच नाही, तर कायद्यानुसार जबाबदारीची जाणीव ठेवून काम करणं अत्यावश्यक आहे. रुग्णांच्या हक्कांची जाणीव, न्यायालयीन निर्णयांचा अभ्यास आणि वैद्यकीय विमा यांची समज असणं डॉक्टरांसाठी आज अपरिहार्य झाले आहे.
मेडिको-लीगल हा शब्द मेडिकल आणि लीगल या दोन संज्ञांचा संयोग आहे. याचा अर्थ वैद्यकीय आणि कायदेशीर क्षेत्राच्या सीमारेषेवर उभा असलेला विषय. एकेकाळी अत्यंत तांत्रिक व मर्यादित प्रमाणात चर्चिला जाणारा हा विषय आजच्या घडीला वैद्यकीय व्यवसाय, रुग्णांचे हक्क, कायदेशीर जबाबदाऱ्या, विमा संरक्षण आणि ग्राहक कायद्यासारख्या अनेक अंगांनी गुंतागुंतीचा ठरत आहे.