डॉ. प्रमोद चौधरी
पर्यावरणपूरक गोष्टी महाग असतात, असा एक मतप्रवाह दिसतो. कुठलीही पर्यावरणपूरक गोष्ट सुरुवातीला महाग असू शकते. बायोप्लॅस्टिक आणि नेहमीच्या प्लॅस्टिकच्या किमतीत फरक पडेलही, पण बायोप्लॅस्टिकसाठी मोजलेली किंमत ही पर्यावरणासाठी मोजलेली किंमत असेल हे लक्षात घ्यायला हवे.
ग्रॅज्युएट चित्रपटाच्या सुरुवातीला बेंजामिनच्या ग्रॅज्युएशन पार्टीमध्ये त्याच्या वडिलांचे एक मित्र बेंजामिनला सल्ला देतात... ‘प्लॅस्टिक्स... देअर इज अ ग्रेट फ्युचर इन प्लॅस्टिक्स’. १९६७मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट. तेव्हा प्लॅस्टिकचा वापर आत्तासारखा अतिरेकी नाही, पण सुरू झाला होता, आणि प्लॅस्टिकमध्ये ‘उज्ज्वल भविष्य’ दडलेले आहे, याची जाणीव जगाला होऊ लागली होती. ग्रॅज्युएट चित्रपटातले हे दृश्य याचे उत्तम उदाहरण आहे.