Premium|Cost of Living in Cities : पगार वाढतोय, पण बचत का वाढत नाही? शहरातल्या खर्चाचं हे गणित समजून घ्या

The Real Cost of City Life : मोठ्या शहरात राहण्याचा खर्च केवळ घराच्या किमतीपुरता मर्यादित नसतो. प्रवास, वेळ, कर्ज, दैनंदिन गरजा आणि संधींची किंमत यांचा एकत्रित परिणाम कुटुंबाच्या बचतीवर होतो.
The Real Cost of City Life

The Real Cost of City Life

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

काही लोक मोठ्या शहराच्या मध्यवर्ती भागात राहण्याऐवजी दूरच्या उपनगरात घर घेतात. घराची किंमत कमी असते, पण त्यासाठी रोज अधिक वेळ आणि प्रवासाचा खर्च करावा लागतो. म्हणजेच एक खर्च कमी करताना दुसरा खर्च वाढतो. इथंच आपल्याला शहरातलं अर्थशास्त्र एक महत्त्वाची गोष्ट शिकवतं. शहरात प्रत्येक निर्णय केवळ पैशांचा नसतो, तो वेळ, अंतर आणि उपलब्ध संधी यांचाही असतो. म्हणूनच शहरात राहण्याच्या खर्चामागचं गणित समजून घ्यायचं असेल, तर फक्त किमतींकडे पाहून चालत नाही.

महिन्याच्या ठरलेल्या दिवशी मोबाईलवर पगार जमा झाल्याचा संदेश येतो आणि घरात नेहमीप्रमाणे छोटासा आनंद पसरतो. काही वर्षांपूर्वी मोठ्या शहरात आलेल्या त्या कुटुंबासाठी हा दिवस नेहमीच खास असतो. एकेकाळी ज्या उत्पन्नासाठी त्यांनी गाव सोडलं होतं, ते आता वास्तवात मिळू लागलेलं असतं. घराचं कर्ज वेळेवर भरलं जात असतं, मुलं शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागलेली असतात आणि आर्थिक परिस्थितीही पूर्वीपेक्षा निश्चितच स्थिरावलेली असते. पण अनेकदा हा आनंद फार काळ टिकत नाही. पगार झाल्यानंतर काही मिनिटांतच महिन्याच्या खर्चाची यादी समोर येते. गृहकर्जाचा हप्ता, वीज बिल, मोबाईल आणि इंटरनेट, वाहनासाठी इंधन, किराणा, घरकामासाठी मदतनीस, विम्याचे हप्ते, मुलांच्या पुढील शिक्षणासाठीची बचत, अधूनमधून बाहेर जेवणं, एखाद्या वाढदिवसाची भेटवस्तू... यादी काही संपतच नाही. संध्याकाळपर्यंत बँक खात्यातील शिल्लक पुन्हा एकदा कमी झालेली दिसते. तेवढ्यात कळत्या वयात आलेला मुलगा सहज शंका म्हणून विचारतो, ‘बाबा, आपला पगार तर दर काही वर्षांनी वाढतोय. मग बचत तितक्या वेगानं का वाढत नाही?’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com