

Winter Skin Care
esakal
केसांची व त्वचेची निगा राखण्यासाठी घरातून बाहेर पडताना स्कार्फ किंवा टोपी वापरावी. हिवाळ्यात हवेत उडणाऱ्या धुलिकणांचे व परागकणांचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे डोळ्यांभोवती अथवा चेहऱ्यावर अॅलर्जी येऊन खाज येण्याचे व पुरळ उठण्याचे प्रमाण जास्त असते.
यंदा महाराष्ट्रात सगळीकडेच गारवा पसरला आहे. यावेळचा हिवाळा पावसाळ्याप्रमाणेच अधिक तीव्र असल्याचे जाणवत आहे. हिवाळ्यात हवेत आर्द्रता नसल्यामुळे त्वचेवर जास्त कोरडेपणा जाणवतो. बोचरे वारे, उडणारी धूळ यामुळे त्वचेवर विपरीत परिणाम झाल्याचे जाणवते. दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका व रात्री जाणवणारा गारवा अशा विषम वातावरणाचा परिणाम त्वचेवर व केसांवर होत असतो. परंतु आपण त्वचेची व केसांची योग्य काळजी घेतली, तर हिवाळा सुसह्य होऊ शकतो.