

natural light interior design
esakal
नैसर्गिक प्रकाश हेच उत्तम वास्तुकलेचं खरं सौंदर्य. घराचं किंवा ऑफिस स्पेसचं इंटेरियर करताना नैसर्गिक प्रकाशाच्या वापराला महत्त्व देणं ही आता काळाची गरज ठरते आहे. त्यासाठी उजेड येणाऱ्या दिशेचा योग्य अभ्यास, नावीन्यपूर्ण संकल्पना, उपयुक्त साहित्य आणि तंतोतंत नियोजनाचा पाया आवश्यक असतो. नैसर्गिक प्रकाशाची सर्वाधिक मदत घेतली तर वास्तूचं रूप आणखीनच खुलतं.
सध्या इंटेरियर डिझाईनिंगमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करून घेणे हे केवळ सौंदर्याशी संबंधित नसून आवश्यकतेकडे वळत चालले आहे. घर, ऑफिस किंवा इतर; वास्तू कोणतीही असो, नैसर्गिक प्रकाशाचा योग्य उपयोग केल्यास जागा सुंदर तर दिसतेच, पण त्याचबरोबर याचा आपल्या आरोग्यावर, मनःस्थितीवर तसेच ऊर्जा बचतीवरही थेट परिणाम होतो. प्रकाश म्हणजे ऊर्जा. ही ऊर्जा जेव्हा वास्तूच्या रचनेमध्ये संवेदनशीलपणे मिसळली जाते, तेव्हा संपूर्ण जागेचा ‘स्वभाव’च बदलून जातो.