VadiEsakal
साप्ताहिक
खोबऱ्याच्या वड्यांव्यतिरिक्तही करता येतात इतक्या प्रकारच्या वड्या; आता या फळांच्या वड्या करून पहाच.!
काजूची वडी, आंबा वडी, पेरू वडी, निनावं
वैजयंती हिंगे
मटार वडी
साहित्य
दोन वाट्या मटार दाणे, २ वाट्या साखर, १ वाटी फूल क्रीम दूध, थोडी साय, मिल्क पावडर, आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड, काजू-बदाम पावडर किंवा तुकडे, २ चमचे तूप.
कृती
प्रथम किंचित सोडा टाकून मटार गरम पाण्यात उकळून घ्यावे. लगेच गार पाण्यात टाकावेत. यामुळे वडीला छान हिरवा रंग येतो. मग दूध घालून मटार दाण्यांची मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी.