Premium|Value for Money : कराचा पैसा कुठे खर्च करायचा?

Public Spending : सरकारचा पैसा नेमका कुठे आणि किती खर्च झाला, यापेक्षा त्या खर्चातून नागरिकांना प्रत्यक्ष किती फायदा झाला, हे मोजण्यासाठी ‘व्हॅल्यू फॉर मनी’ संकल्पना महत्त्वाची ठरते.
Value for Money

Value for Money

esakal

Updated on

डॉ. अमेय खरे

रस्ता बांधला, पण प्रवासाचा वेळ कमी झाला का? बस सुरू केली, पण लोकांना ती उपयोगी पडते का? पाणीपुरवठ्यावर खर्च झाला, पण नियमित पाणी मिळतं का? रुग्णालय उभारलं, पण वेळेवर आणि परवडणारी सेवा मिळते का? अशा प्रश्‍नांची उत्तरं शोधल्यावर ‘व्हॅल्यू फॉर मनी’, म्हणजेच खर्च केलेल्या पैशाच्या तुलनेत मिळालेलं मूल्य, ही संकल्पना महत्त्वाची ठरते.

मागच्या लेखात (ता. १२ सप्टेंबर) आपण ‘कर का भरतो?’ या प्रश्‍नावर चर्चा केली. कर म्हणजे केवळ आपल्या पगारातून कमी होणारी रक्कम नाही, तो समाजाच्या सामूहिक गरजा पूर्ण करण्यासाठी उभा केला जाणारा पैसा आहे. पण करातून पैसा जमा झाला की सरकारसमोर एक वेगळाच प्रश्न समोर येतो, हा पैसा खर्च कुठे करायचा?

समजा, आपल्या घराचं मासिक उत्पन्न ठरलेलं आहे. घरभाडं, किराणा, वीज, मुलांचं शिक्षण, आरोग्य, प्रवास, कर्जाचा हप्ता आणि बचत अशा अनेक गरजा आहेत. प्रत्येक गोष्टीवर मनासारखा खर्च करता येत नाही. त्यामुळे आपण प्राधान्य ठरवतो. कधी घरात एखादी तातडीची दुरुस्ती करावी लागते, तर एखादी इच्छा पुढच्या महिन्यावर ढकलावी लागते. कधी बचतीसाठी पैसा बाजूला ठेवला जातो, तर कधी अचानक आलेल्या वैद्यकीय खर्चामुळे संपूर्ण बजेट बदलतं. सरकारसमोरही मूलभूत प्रश्न हाच असतो. फरक एवढाच की सरकारचा बजेटचा निर्णय एका घरापुरता मर्यादित नसतो. त्याचा परिणाम लाखो लोकांच्या आयुष्यावर होतो.

एका शहराकडे विकासासाठी मर्यादित निधी आहे. एका बाजूला नवीन रस्ता बांधण्याची गरज आहे. दुसरीकडे जुन्या रस्त्यांची दुरुस्ती बाकी आहे. कुठेतरी पाणीपुरवठ्याची समस्या आहे, तर कुठे सार्वजनिक वाहतूक सुधारण्याची गरज आहे. आरोग्य, स्वच्छता, शिक्षण, उद्यानं, गृहनिर्माण आणि पर्यावरण यांचीही स्वतंत्र गरज आहे. सगळं एकाच वेळी करता येत नाही. म्हणून सार्वजनिक खर्चाचा खरा प्रश्न ‘किती पैसा खर्च करायचा?’ एवढाच नसून ‘उपलब्ध पैशातून आधी काय करायचं?’ हा असतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com