

How to Make Varai Anarse
esakal
मीनाक्षी काटकर
वाढप
१० ते १५ व्यक्तींसाठी
साहित्य
एक किलो वरई, ८०० ग्रॅम गूळ, तळण्यासाठी तेल, गरजेनुसार खसखस.
कृती
वरई तीन दिवस पाण्यात भिजत घालावी. तीन दिवसांनंतर वरई पाण्यातून काढून कापडावर पसरावी. वरई थोडी कोरडी झाल्यानंतर मिक्सरमध्ये फिरवून तिचे बारीक पीठ करावे. या पिठात गूळ किसून घालावा व परत मिक्सरमध्ये फिरवून गोळा तयार करावा. हे मिश्रण दोन ते तीन दिवस मुरण्यासाठी ठेवावे. दोन ते तीन दिवसांनंतर या पिठाचे छोटे गोळे करून अनारसे लाटावेत. लाटलेले अनारसे खसखशीमध्ये घोळवून तुपामध्ये मंद आचेवर तळून घ्यावेत.
टीप ः या अनारशांमध्ये शिंगाडा पीठही वापरू शकता.
वाढप
३ ते ४ व्यक्तींसाठी
साहित्य
एक वाटी वरईचे पीठ, १ वाटी राजगिरा पीठ, १ वाटी शिंगाडा पीठ, १ वाटी किसलेला बटाटा, १ वाटी शेंगदाण्याचे कूट,
१ चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ, चिमूटभर सोडा, ५ ते ७ कढीपत्त्याची पाने (ऐच्छिक), १ चमचा तूप.
कृती
प्रथम वरईचे, राजगिऱ्याचे व शिंगाड्याचे पीठ एकत्र करावे. त्यात किसलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट व हिरव्या मिरचीची पेस्ट घालून मिश्रण एकजीव करावे. मग मीठ व कढीपत्त्याची पाने घालावीत व पाणी घालून मिश्रण पातळसर भिजवून घ्यावे. या मिश्रणात सोडा घालावा. तव्याला तूप लावून हे मिश्रण जाडसर पसरवावे. वरईची तिखी दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्यावी.