Premium|War and Political Conflict : शत्रूचा निःपात की राष्ट्राचा विनाश? युद्धाच्या निर्णयांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने

Military Strategy and Drone Warfare : युद्धभूमीवरील रक्तरंजित संघर्ष, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर, वाढता लष्करी खर्च आणि सत्ताधारी-विरोधकांमधील संघर्ष यातून युद्धाचे भयावह परिणाम आणि राजकीय निर्णयांचे गंभीर प्रश्न समोर येतात.
War and Political Conflict

War and Political Conflict

esakal

Updated on: 

पुरुषोत्तम रामकृष्ण रामदासी, पुणे

काही वेळापूर्वी युद्धाच्या धुमश्चक्रीत तो मशिनगनने बेछूट गोळीबार करत शत्रूकडे धावत होता. शत्रूराष्ट्राच्या सैनिकांचा निःपात करताना तो आपल्या जागेवरून हरवला होता. एके ठिकाणी भूसुरुंगावर त्याचा पाय पडताच जबरदस्त स्फोट झाला. तो हवेत उडाला. तो शुद्धीवर आला तेव्हा त्याचे अंगांग ठणकत होते. अंगावरच्या युनिफॉर्मची लक्तरे लोंबत होती...

लष्करप्रमुख बोगवान म्हणाले, ‘‘निर्वाणीचा हल्ला करून शत्रूला बेचिराख करायचे असेल तर, आपल्या मित्रदेशाकडून घेतलेले एमक्यूनाइन रीपर्स, आय मीन ड्रोन्सद्वारे अापल्याला हेलफायर क्षेपणास्त्रे वापरावी लागतील...’’ मायकोलांचे डोळे असुरी आनंदाने चमकले. ते म्हणाले, ‘‘व्हेरी गुड. कारवाई ताबडतोब सुरू करा. आपण जळून राख झालो तरी हरकत नाही, पण मरता मरता शत्रूराष्ट्र उद्‍ध्वस्त तर करू...!’’

राष्ट्राध्यक्षांनी बोलवलेल्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये वातावरण गंभीर होते. या बैठकीसाठी लष्करप्रमुख जनरल तारासदेखील उपस्थित होते. शेजारच्या देशाशी चाललेल्या युद्धात निर्णायक भूमिका घेऊन युद्ध लवकरात लवकर संपवावे ही भूमिका मांडताना सर्वांवर नजर फिरवत अध्यक्ष लेक्सी म्हणाले, ‘‘आपल्याला युद्ध जास्त काळ लांबवणे परवडणारे नाही,’’ ते अचानक थांबले. त्यांचा चेहरा रागीट झालेला सर्वांनी पाहिला. विरोधी पक्षातील एक लोकप्रतिनिधी तातियाना हसत होती.

‘‘मी काही विनोद केला का मिस तातियाना?’’

‘‘नाही, पण हसू याचे आले, की युद्ध सुरू करणेच मुळात परवडणारे नव्हते.’’

‘‘युद्ध आपल्यावर लादले गेले आहे. मी नाही सुरू केले.’’

‘‘प्रत्युत्तर देण्याचे अनाठायी शौर्य दाखवायची गरज नव्हती.’’

‘‘मग काय पळपुटेपणा करायचा होता का?’’

‘‘नाही. पण तरीही सारासार विचार करून निर्णय घेता आला असता,’’ पळभर थांबून त्या पुढे म्हणाल्या, ‘‘राजकारणात अनेक वाटावळणे असतातच पण युद्धज्वराचे वळण दगाबाज असते; ते असा चकवा देते की संपूर्ण राष्ट्र दरीच्या टोकावर उभे राहते.’’

वाद वाढू नये म्हणून उपाध्यक्ष इव्हान म्हणाले, ‘‘मी उभयतांस विनंती करतो की आपण वादविवाद करण्यापेक्षा देशाच्या हिताचा विचार करू या.’’

‘‘आपल्या शब्दाचा मी आदर करते सर,’’ तातियाना म्हणाली, ‘‘पण तत्पूर्वी एवढेच सांगते, की सत्य क्रूर असते तेव्हा सत्ताधारी ते दडपतातच!’’ हे ऐकून तिला खरमरीत उत्तर देण्याची राष्ट्राध्यक्षांना उबळ आली. पण इव्हानने त्यांना रोखले. त्यांच्या नेमस्त बोलण्याने तणाव कमी झाला. त्यांनी खुणावताच लेक्सी म्हणाले, ‘‘आपण सर्वजण जाणता की युद्धावर आपला अमर्याद खर्च होतोय. आता शत्रूवर निर्णायक हल्ला करायची वेळ आली आहे, असा हल्ला की शत्रू गारद झाला पाहिजे. तुम्ही यासाठी काय करू शकता जनरल?’’ जनरल तारास म्हणाले, ‘‘मिस्टर प्रेसिडंट, एमवनएटू अब्राम्स टँकचा वापर वाढवू.’’

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com