
डॉ. सदानंद मोरे
प्रस्तुतचे संपादन हे एका थोर मराठा मुत्सद्दी व सेनानीच्या पदांचे आहे. त्यांचे नाव आलीजाबहादर महादजी शिंदे. मराठ्यांच्या सत्तेचा उत्तरेत विस्तार करण्यासाठी अठराव्या शतकात जी घराणी पुढे आली त्यांच्यात उज्जैन-ग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे नाव अग्रभागी होते. या घराण्याने स्वराज्यासाठी बलिदान करणारे योद्धे दिले, हे सर्वच जाणतात. ‘बचेंगे तो और भी लड़ेंगे’ हे दत्ताजी शिंदे यांचे महावाक्य इतिहासात अजरामर झाले आहे. त्यांचे खऱ्या अर्थाने प्रगटीकरण कोणी केले असेल तर ते महादजीबाबांनी.