Premium|Wastewater Management : पिण्याचे पाणी खरंच शुद्ध आहे का? सांडपाणी व्यवस्थापन आणि गुणवत्तेचा मोठा प्रश्न

Wastewater Management and Water Treatment : सांडपाणी कमी करणे, उपलब्ध प्रक्रिया केंद्रांचा प्रभावी वापर आणि पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता राखणे यासाठी वैज्ञानिक संशोधन, काटेकोर निकष आणि व्यापक जनजागृतीची गरज आहे.
Wastewater Management

Wastewater Management

esakal

Updated on: 

डॉ. प्रमोद प्र. मोघे

सांडपाणीनिर्मिती कशी कमी करता येईल? सांडपाण्यातील घटकांचे नियोजन कसे करता येईल? नवीन प्रक्रिया केंद्रे उभी करण्याऐवजी आहेत त्या केंद्रांद्वारे सांडपाण्याचे रूपांतर गुणवत्तेच्या निकषांमध्ये बसणाऱ्या शुद्ध पाण्यात कसे करता येईल? व पिण्याचे पाणी शुद्ध करण्याची प्रक्रिया कोणत्या प्रकारची असावी? याबद्दल अधिक संशोधन व जनजागृती होणे आवश्‍यक आहे.

स्वातंत्र्यकाळानंतर आपल्या देशाने खरोखरच वैज्ञानिक क्रांती केली आहे. त्याला पर्यावरण संशोधन क्षेत्रही अपवाद नाही. पण आपल्या देशात या संशोधनांमधून पुढे आलेल्या निरीक्षणांचा सर्व पातळ्यांवर आणखी उपयोग व्हायला हवा, असे वाटते.

देशातील नागरिकांना मिळणारे पाणी शुद्ध आहे की नाही, त्या पाण्यात कोणते आवश्यक घटक किती प्रमाणात असावेत, याची जागतिक आरोग्य संघटनेने ४७ परिमाणे दिलेली आहेत. त्या धर्तीवर आपल्या देशाने आयएसओ १०५०० (१९९१नुसार) ही ४७ परिमाणे केंद्र व राज्य सरकारने स्वीकारलेली आहेत. ही परिमाणे काटेकोरपणे पाळली जाणे आवश्‍यक असते, कारण जवळपास ७० ते ८० टक्के रोग पिण्याच्या पाण्यामुळे होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com