Healthy Lifestyle: वाढणारं वय, दमणारं हृदय

Heart Care: हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवायचं असेल, तर नियमांची ही चावी पक्की धरावी लागेल. आणि त्याचं फळ? एका सुदृढ, आनंदी जीवनाचं आश्वासन!
healthy heart healthy Lifestyle
healthy heart healthy Lifestyle Esakal
Updated on

डॉ. ऋतुपर्ण शिंदे

आधुनिक जग बेसुमार वेगानं पुढं जात आहे. तंत्रज्ञान आणि विकासाचा झपाटा यामुळे मानवी जीवन खूप वेगवान झालं आहे; पण या गतिमान प्रगतीच्या मागे काहीतरी हरवतंय - ते म्हणजे आपलं आरोग्य. सकाळी उशिरा उठणं, फास्ट फूडचं आकर्षण, सतत कामाचा ताण आणि वाढलेला स्क्रीन टाइम या सगळ्या सवयींचा शरीरावर खोलवर परिणाम होतोय. हाच विषय अधिक सखोलपणे समजून घेऊया..

तंत्रज्ञान प्रगत होतंय, त्यातून जीवन सुखकर होतंय हे सगळं खरं असलं, तरीही या बदललेल्या जीवनशैलीतून आरोग्यविषयक धोके सातत्याने वाढताहेत. भारतासारख्या देशात, जिथं पूर्वापार चालत आलेल्या जीवनशैलीला आरोग्यपूर्ण मानलं जायचं, तिथं आता जीवनशैलीशी संबंधित आजारांनी संसर्गजन्य आजारांनाही मागे टाकलं आहे. मधुमेह, स्थूलता, उच्च रक्तदाब आणि हृदयविकार हे आजार आता मृत्यूचं मुख्य कारण ठरत आहेत. आश्चर्य म्हणजे भारताला ‘मधुमेहाची राजधानी’ असं म्हणायला सुरुवात झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com