लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त)
भारतीय सशस्त्र दलांमध्ये भरती होण्याची अनेक तरुण-तरुणींची इच्छा असते. भरती होण्यासाठीच्या परीक्षा देताना विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक व मानसिक कस लागतो. निवडकातीलही निवडक विद्यार्थी देशसेवेसाठी निवडले जातात. सैन्यदलात भरती होण्यासाठीच्या परीक्षांची संकलित माहिती...
भारतीय सशस्त्र दलांतील करिअरकडे बघताना मनाच्या गाभाऱ्यात राष्ट्रीयत्त्वाची भावना असते. करिअरच्या या पर्यायांमध्ये चारित्र्य विकसित होते, नैतिक मूल्ये रुजवली जातात. हे करिअर साहसी आणि आव्हानात्मक असून व्यक्तीला शारीरिकदृष्ट्या कणखर आणि मानसिकदृष्ट्या सतर्क करते. या करिअरमुळे व्यक्तीला सामाजिक प्रतिष्ठा तर मिळतेच, पण त्याचबरोबर चांगले वेतन आणि नोकरीची सुरक्षादेखील मिळते. भारतीय सशस्त्र दलांमध्ये करिअर करण्यासाठी वेगवेगळे प्रकार असतात.