अॅड. आनंद कुलकर्णी
पुनर्विकासासंबंधीच्या अडचणी टाळण्यासाठी त्या संपूर्ण प्रक्रियेतील कायदेशीर बाबींची आणि त्यांच्या परिणामांची पूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. योग्य तयारीमुळे प्रक्रिया सुलभ होते, तुमचे हक्क सुरक्षित राहतात आणि संभाव्य वाद टाळता येतात.
शहरांतील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारती कालापरत्वे जुन्या झाल्यावर त्यांचा पुनर्विकास अपरिहार्य ठरतो आहे. मात्र हा निर्णय सर्वंकष विचार करूनच घ्यायला हवा. पारदर्शक कायदेशीर प्रक्रिया आणि मार्गदर्शक सूचनांच्या आधारे गृहनिर्माण सहकारी संस्थाच्या इमारतींचा पुनर्विकास करणे शक्य आहे.