डॉ. रश्मी उर्ध्वरेषे
चाकाच्या शोधापासून सुरू झालेला माणसाचा प्रवास आता चालकाशिवाय चालणाऱ्या गाडीपर्यंत येऊन पोहोचलाय. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जमिनीवरून, पाण्यातून, हवाई तसेच अंतराळातील प्रवासही आता अधिक सोईस्कर झाला आहे.
अलीकडच्या काळात तंत्रज्ञान कसे विकसित होत गेले, याचे उत्तम उदाहरण म्हणजे दळणवळण किंवा वाहतूक क्षेत्र. वाहतूक क्षेत्रातील तंत्रज्ञानाची प्रगती खरोखरच विस्मयजनक आहे.
सतराव्या शतकातील वाफेवरची बोट ते एकोणीसाव्या शतकातील सायकलीपर्यंत आणि १८९०मधील मोटारगाडीपासून ते एकोणिसाव्या शतकातील रेल्वे आणि विमानापर्यंतची प्रगती पाहता या क्षेत्राने सतत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला दिसतो. त्यामुळे आधुनिक काळातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा वापर करण्यापासून हे क्षेत्र कसे दूर असेल!