नेहा लिमये
रॅप शैली म्हणजे त्यात कसंही, काहीही करून चालतं, जरा बडबड केली, ठेका धरला आणि शब्द म्हटले की झालं किंवा हिप-हॉप काय आणि रॅप काय, एकूण एकच, त्यात काय एवढं - असं जर कुणाला वाटत असेल तर त्यानं रॅपचा इतिहास आणि तो घडतानाची ही गाणी जरूर ऐकावीत. कारण केआरएस-वन म्हणतो तसं, ‘Rap is something you do, Hip Hop is something you live.’
उठ जा अपनी राख से, तू उठ जा अब तलाश में
परवाज़ देख परवाने की आसमाँ भी सर उठाएगा
अपना time आएगा...