.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
संपादकीय
खेळातली, आणि जगण्याच्या पटावरचीही, हारजीत प्रासंगिक असते; सहभाग महत्त्वाचा! अवघ्या मानवजातीला एका अनामिक अस्वस्थेत लोटून, अशांत शांततेने लपेटून टाकणाऱ्या कोरोना काळानंतर हा विचार पुन्हा एकदा अर्थपूर्ण ठरत जातो आहे. अस्वस्थ करणाऱ्या बदलांची नांदी घेऊन येणाऱ्या घटनांचा वेग वाढत असताना चार वर्षांपूर्वी ऑलिंपिक चळवळीने आपल्या घोषवाक्यात आणखी एक शब्द जोडला - कोम्युनिटर! एकत्र... एकोपा... एकात्मता... मिलाफ!!