
डॉ. राधिका टिपरे
मावळतीच्या सोनेरी किरणांनी अवघ्या निसर्गाला सोनेरी वर्ख चढवल्याचा भास होत होता. दूर क्षितिजापर्यंत निलगिरीच्या डोंगररांगा एकापुढे एक, लडी उलगडत जाव्या, तशा दिसत होत्या... हिरवा रंग फिकट होत पुढे पुढे या रांगा खरोखरच निळ्या दिसत होत्या. दर पाच-दहा मिनिटांनी शिटी वाजवत गाडी बोगद्यात शिरायची... कधी उजव्या बाजूचं वळण घेत, तर कधी डाव्या बाजूचं वळण घेत...