विशाखा बाग
स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक युगातल्या सध्याच्या मुलांना करिअरच्या संधीही अनेक आहेत. त्या क्षेत्रांमध्ये सातत्यानं स्किल्ड लेबरची आवश्यकता वाढत आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन पिढीला अनोख्या वाटा धुंडाळण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे.
मात्र त्यात यशस्वी होण्यासाठी पालकांचा पाठिंबा असणं अतिशय आवश्यक आहे. पालक विद्यार्थ्यांच्या मागे विश्वासाने उभे राहिले, तर मुलंसुद्धा त्यांना आवडणाऱ्या क्षेत्रात काम करून यशस्वी होण्याचा मार्ग नक्की शोधू शकतील.