रोहन नामजोशी
एआय अजूनही शिकतंय, त्याला तितकीशी जाण नाही. त्यामुळे तिथं मानवी बुद्धिमत्तेची, विवेकाची, निरीक्षणाची खूप गरज आहे. एआयमुळे पुढचा काही काळ तरी भाषातज्ज्ञांची नोकरी हिरावली जाणार नाही. किंबहुना त्यांची सातत्यानं गरज लागणारच आहे. त्यामुळे भाषेवरची पकड मजबूत करण्याची हीच ती वेळ आणि हाच तो क्षण!
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात समुद्राप्रमाणे लाटा येतात. काही स्थिरावतात, तर काही निघून जातात. काही वर्षांपूर्वी चॅट जीपीटी नावाचं एक टूल उदयाला आलं आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जणू त्सुनामीच आली. चॅट जीपीटी जगातलं काहीही करू शकतो, मग आता माणसं काय करणार? आमच्या नोकऱ्या जाणार का? आता माणसाच्या मेंदूची गरजच काय? असे अनेक प्रश्न आपल्याला पडू लागले. एआय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता म्हटलं, की ‘आता नोकऱ्या जाणार’ हीच भीती समाजमनात बसली आहे. ही भीती काही अंशी खरी असली, तरी सगळ्याच क्षेत्रांना ती लागू होत नाही.
(Addressing fears of AI-driven job displacement, this article highlights why human intelligence, wisdom, and strong language skills remain crucial in the evolving tech landscape.)