Premium| Indian Chat: मोगलांपासून ठेल्यांपर्यंत...

Panipuri Love: मुळात चाट ही गोष्टच खास आहे! कितीही क्लिशे वाटलं, तरी ‘लव्ह ॲट फर्स्ट बाइट’ व्हायला भाग पाडणारं प्रकरण आहे हे!
indian chaat panipuri
indian chaat panipuriEsakal
Updated on

अदिती मराठे

घरी केलेल्या चाटच्या पदार्थांत अधिक पोषणमूल्यं असतात वगैरे सगळं ठीकच, पण पाणीपुरीच्या ठेल्यावरच्या भैय्याच्या सरावलेल्या हातांचं अचूक प्रमाण, सढळ हातानं घातलेली डावभर चटणी, अंदाजानं तिखट-गोड पाणी बॅलन्स करत भरलेल्या पुऱ्या, त्यावर मुठीने घातलेले शेव-शेंगदाणे किंवा कैरीच्या फोडी या कशाचीच सर तोलून मापून केलेल्या पाककृतीला किंवा ‘फिल्टर’च्या पाण्यात केलेल्या ‘डिश’ला येऊच शकत नाही, कारण शेवटी ‘टोटॅलिटी’मध्ये मजा आणण्याचं गमक त्या भैय्यानं अनुभवानं साधलेलं असतं!

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल... एका रिॲलिटी शोमध्ये एका टेबलाभोवती सर्व परीक्षक कुतूहलानं बघत उभे होते आणि टेबलाच्या दुसऱ्या बाजूला होती भारतीय वंशाची शेफ सुमीत सैगल! तिनं आत्मविश्वासानं आपली रेसिपी सांगायला सुरुवात केली, ‘‘You essentially need to break the puris like this...’’ असं म्हणत अंगठ्यानं पाणीपुरीची पुरी फोडली.

तत्क्षणी आपल्यातल्या चोखंदळ खवैय्यांना लक्षात आलं, की पुरीच्या कुरकुरीतपणाची परीक्षा तिनं इथंच पास केलीय. मग पुढे त्या पुरीत तिनं निगुतीनं एक एक पदार्थ भरायला सुरुवात केली. कोरडे मसाले घातलेला उकडलेला बटाटा, पुदिना-कोथिंबिरीची व चिंच-खजुराची चटणी, आणि वरून पुदिन्याचं पाणी घालून अखेरीस एकेक पुरी प्रत्येक परीक्षकाला खायला दिली.

आख्खी पुरी तोंडात घालण्यात यशस्वी झालेल्या त्या फिरंगी परीक्षकांची प्रतिक्रिया खरोखरच पाहण्यासारखी होती! आधी उत्सुकता, आश्चर्य, मग पहिलीच पुरी खाल्ल्यानंतर अर्थातच खवळलेली जीभ आणि तीव्र आनंदाची लहर त्यांच्या चेहऱ्यावर झळकताना स्पष्ट दिसत होती आणि ती त्यांनी तशी व्यक्तही केली. हे सगळं घडलं गेल्या वर्षीच्या मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया या नामांकित स्पर्धेत!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com