डॉ. शरद आगरखेडकर
लहान मुलांचे योग्य आणि वेळोवेळी लसीकरण केलं, तर ती सशक्त होतील. त्यांची प्रतिकारशक्ती वाढून ती आजारांना तोंड देऊ शकतील. त्यामुळे बाळाचे लसीकरण होईल याची काळजी प्रत्येक पालकाने घ्यायला हवी.
लहान बाळांच्या आणि त्यांच्या पालकांच्या आयुष्यात लसीकरणाला अनन्यसाधारण महत्त्व असायला हवं. त्यासाठी लसीकरणाची संकल्पना, त्याचे फायदे समजून घेणं आवश्यक आहे.
लसीकरण म्हणजे एखाद्या रोगाविरुद्ध शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करण्यासाठी काही रोगांचे लाइव्ह व्हायरस/ बॅक्टेरिया किंवा स्किल्ड बॅक्टेरिया/ व्हायरस किंवा त्यांची काही अँटिजेनिक स्ट्रक्चर्स शरीरात पाठवणं.