फॅशन कॉर्नर : सोनिया उपासनी
सध्या जोरदार थंडी पडते आहे. कधीकधी गार वाऱ्यांनी गारठ्यात आणखीनच भर पडते. वातावरणातील गारवा आणि थंड वाऱ्यांपासून स्वतःचे संरक्षण करायचे, तर उबदार कपड्यांना पर्याय नाही. उबदार कपडे आणि स्टायलिश ॲक्सेसरींमुळे तुमचा लुक एकदम खुलून येईल. त्यामुळेच तुमच्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशा टोप्या, स्कार्फ आणि शाली अशा ॲक्सेसरी वापरून रिच लुक आणता येतो.