Premium|Winter Health Care : हिवाळ्यातील आरोग्याचे रहस्य; थंडीचा आनंद की आजारांचे निमंत्रण?

Winter Wellness Guide : हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा आनंद घेताना शरीरातील चयापचय, हृदयविकार आणि श्वसनसंस्थेवर होणारे परिणाम व घ्यावयाची शास्त्रीय काळजी यांचा सखोल आढावा.
Winter Health Care

Winter Health Care

esakal

Updated on

डॉ. सुबोध देशमुख

हिवाळा आपल्याला थोडं थांबून स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायला शिकवतो. हा ऋतू गुलाबी थंडीचा आणि सुकामेव्याचा आनंद घेण्याचा आहे. फक्त निसर्गाच्या या बदलांशी आपल्या शरीराचे ताळमेळ बसवताना थोडी जागरूकता ठेवली, तर आपण नक्कीच म्हणू शकू - आरोग्यासाठी जिव्हाळ्याचा आहे हिवाळा!

पहाटेची आल्हाददायक थंडी, धुक्याची चादर पांघरलेले डोंगर, स्वच्छ निळे आकाश आणि वातावरणात असलेला एक प्रकारचा जिवंतपणा... असा हा हिवाळा ऋतू मनाला जितका प्रसन्न करतो, तितकाच तो आरोग्यासाठीही उत्तम मानला जातो. उन्हाळ्यातला उकाडा आणि पावसाळ्यातली चिकचिक यानंतर येणारा गारवा सर्वांनाच हवाहवासा वाटतो. जनमानसात हिवाळा म्हणजे ‘हेल्दी सीझन’ असे एक समीकरण रूढ झाले आहे. परंतु, एक डॉक्टर म्हणून जेव्हा मी या ऋतूकडे पाहतो, तेव्हा मला निसर्गाच्या सौंदर्यासोबतच मानवी शरीरात होणाऱ्या गुंतागुंतीच्या बदलांचीही जाणीव होते. हिवाळा हा आरोग्य कमावण्याचा ऋतू असला, तरी तो काही विशिष्ट आजारांना निमंत्रण देणाराही ठरू शकतो. भीती घालणे हा उद्देश नसून, शरीराची काळजी कशी घ्यावी, हे वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेणे ही काळाची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com