

डॉ. अर्चना कुडतरकर
या महिला दिनानिमित्त पुढच्या पन्नास वर्षांत आजपेक्षा वेगळं चित्र बघायला मिळण्यासाठी काय काय करावं लागेल याचा विचार करूया. समाजातील कोणताही एक घटक जेव्हा पुढे जात असतो तेव्हा त्याला जाणीवपूर्वक संधी द्याव्या लागतात, त्या देऊ या. संधी घेणाऱ्या व्यक्तींच्या बाजूने कुटुंबाला, समाजाला उभं राहावं लागतं. इतकंच नाही, तर संधी मिळत असताना संधी घेणारा चाचपडत असतो, त्या चाचपडण्याला दिशा देण्याचं कामही करावं लागतं, तेही करू या.